धरण माहिती
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या तारुखेडले या गावाच्या जवळच हे धरण आहे. कडवा आणि गोदावरी या दोन्ही नद्यांच्या संगमावर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. १९०७ ते १९१६ काळात इंग्रजांनी हे धरण बांधले. २००८ साली धरणाचे मजबुतीकरण करण्यात आले.
नांदूर मधमेश्वर धरणाची उंची १४.९१मीटर म्हणजे ४८.९२ फूट तर लांबी ११०४ मीटर म्हणजे ३६२२ फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १.०६ टीएमसी म्हणजे १०६० दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला दोन बाजूनी दरवाजे आहेत. एका बाजूला ५ तर दुसऱ्या बाजूला ३ दरवाजे आहेत.
धरणातून जाणाऱ्या दोन कालव्यांचा उपयोग शेतीसाठी केला जातो.
सिमेंट बंधारे
माहिती उपलब्ध नाही